Lalit Masik (1 year Subscription)

380

Lalit Masik (4 year Subscription)

1400

ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने १९६४ साली ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह’ या विषयांना वाहिलेल्या ‘ललित’ या वाङ्मयीन मासिकाची सुरुवात झाली. ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने ‘ललित’ने अनेक उपक्रम राबविले. साहित्यविषयक अनेक स्पर्धा ‘ललित’ घेत असते आणि त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.


‘दिवाळी अंकांनी आम्हांला काय दिले?’, ‘दिवाळी अंकांकडून काय अपेक्षा’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारख्या अनेक स्पर्धा ‘ललित’ने घेतल्या. ‘ललित शिफारस’, ‘मानाचे पान’, ‘लक्षवेधी पुस्तके’, ‘वाचन आणि स्मरण’ यांसारखी ‘ग्रंथप्रसारा’च्या दृष्टीने अनेक सदरे ‘ललित’मधून सुरू केली. ‘लेखकाचे घर’, ‘दशकातील साहित्यिक’, ‘स्वागत’, ‘ठणठणपाळ’, ‘काय लिहिताय?, काय वाचताय?’, ‘गोमा गणेश’, ‘अलाणे-फलाणे’, 'आनंदीआनंद', 'टप्पू सुलतानी', ‘चोखंदळ वाचकांची निवड’, ‘सप्रेम नमस्कार’, ‘दृष्टिक्षेप’, ‘निर्मितिरंग’, ‘गप्पा-टप्पा’, ‘सौरभ’, ‘ग्रंथगप्पा’, ‘शहाणं पुस्तकवेड’ 'पुस्तक गजाली', 'पन्नाशीपूर्वीची पुस्तके' यांसारखी अनेक वाचकप्रिय सदरे ‘ललित’मधून प्रसिद्ध झाली/होत असतात. ‘वि. स. खांडेकर’, ‘पु. ल. देशपांडे’, ‘व्यंकटेश माडगूळकर’, ‘वसंत सरवटे’, ‘जी. ए. कुलकर्णी’, ‘केशवराव कोठावळे’, ‘गो. नी. दाण्डेकर’, ‘जयवंत दळवी’, ‘ठणठणपाळ’, ‘विंदा करंदीकर’, 'दुर्गा भागवत', 'भालचंद्र नेमाडे', 'मंगेश पाडगावकर', ‘कुसुमाग्रज’, यांसारखे संग्राह्य विशेषांक प्रसिद्ध केले.


‘ललित दिवाळी अंकां’ची मुखपृष्ठे सलग ५० वर्षे श्री. वसंत सरवटे यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ, वृत्तपत्र लेखक संघ सामाजिक विकास मंडळ म. सा. प., रामशेठ ठाकूर यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार ‘ललित’ला मिळाले आहेत. १९८८ साली 'ललित' मासिकाच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कथा, कादंबरी, कविता, चरित्रे-आत्मचरित्रे, नाटक यांसारखे वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले विशेषांक मान्यवर लेखकांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध करण्यात आले. त्या निमित्ताने नागपूर, गोवा यांसारख्या ठिकाणी 'मॅजेस्टिक गप्पां'चेही आयोजन करण्यात आले.


२०१३ साली 'ललित'चा सुवर्णमहोत्सव 'वाचनसंस्कृती' (संजय भास्कर जोशी), 'कविता' (वसंत पाटणकर), 'वाङ्मयीन नियतकालिके' (सतीश काळसेकर), 'कथा' (पुष्पलता राजापुरे-तापास), 'कादंबरी' (नागनाथ कोत्तापल्ले), 'समीक्षा' (विलास खोले), 'चरित्र-आत्मचरित्र' (मीना वैशंपायन), 'नाटक' (अनंत देशमुख), 'ललित गद्य' (वि. शं. चौघुले), 'दृश्यकला' (वसंत सरवटे/दीपक घारे) हे विशेषांक काढून साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमात 'ललित'चे संस्थापक-सदस्य असलेले ज्येष्ठ लेखक श्री. मधु मंगेश कर्णिक आणि व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

×
My Cart